धन्यवाद मंडळी,
एक म्हणता म्हणता बरेच शब्द सापडले. प्रत्येकाचा अर्थ जवळपास सारखाच असला तरीही प्रत्येक शब्द वेगवेगळ्या संदर्भात जास्त उपयोगी ठरेल.
शब्दशः भाषांतरानुसार आभासी हा शब्द (मिलिन्दनं सुचवलेला) चांगला आहे पण एखाद्या माणसाविषयी बोलताना (म्हणजे उदा. he is pseudo) 'तो आभासी आहे' असं म्हणण्यापेक्षा 'तो दांभिक आहे' हे जास्त भाषासुलभ वाटेल.
'छद्म' हाही चांगला शब्द आहे. छद्मी पण त्यावरुनच निघाला असेल? अर्थात छद्मीपणात नुसताच फसवेपणा नसतो तर थोडासा खुनशी पणा पण असतो.
वेगळ्या सन्दर्भांमधे दर्शनी, ढोंगी हे ही वापरता येतील.
म्हणजे थोडक्यात pseudo वाटला होता तेवढा आभासी नाहीये!
पुन्हा एकदा धन्यवाद!
- मिलिंद