पण उचलेगिरीची व्याख्या अधिक व्यापक आहे.  आपल्या लिखाणात मूळ स्रोतास श्रेय न देता दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पना किंवा अभिव्यक्ती वापरणे म्हणजे उचलेगिरी.

सर्वसाधारणपणे उत्कृष्ठ लिखाण हे वैविध्यपूर्ण वाचन, समर्पक अनुभव आणि व्यापक विचार यांच्या आधारावर उभं रहातं.  सहाजिकच वाचनात किंवा अनुभवांतून दृष्टोत्पत्तीस आलेल्या दुसऱ्या व्यक्तिच्या कल्पना किंवा अभिव्यक्तींचा लिखाणावर प्रभाव पडतोच.  हा प्रभाव बहुतांश वेळेला नकळत घडलेला असतो.  याला उचलेगिरी म्हणता येणार नाही. कित्येक वेळेला दुसऱ्या कुणीतरी दाखवे पर्यंत लेखकाला याची कल्पनाही नसते. 

सन्जोपनं वर दिलेल्या उदाहरणातल्या  'तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा' आणि 'ये हवा ये रात ये चांदनी'च्या साधर्म्यामुळे मदनजींनी अगदी ठरवून उचलेगिरी केलीच असेल असं नाही म्हणता येणार.

काय वाटतं ?