उंदिराख्यान छान आहे. गणेशवाहन म्हणून थेट देवघरात स्थान मिळाले असले तरी खरोखरीचा उंदीर दिसल्यावर पूजेच्या षोडशोपचाराऐवजी इतर उपचारच केले जातात.

संगणकाचा उंदीर उपयोगी आहे खरा.

मिकी आवडतो, पण मिकी "सालस, सद्गुणी आणि मनमिळाऊ" असल्याने असेल कदाचित, प्लुटो आणि डोनाल्ड डक जास्त आवडतात.

प्रत्यक्षात उंदीर ही एक मोठी समस्या आहे हे खरे. अन्नसाखळीत उंदरांवर गुजराण करणारी कडी कमजोर झाल्याने समस्या अधिकच जटिल झाली आहे.