प्रयोजन हेच. इतर कुठलेरी खोडसाळ प्रयोजन नाही.

खोडसाळपणाचा दावा नाही, तशी शंकाही नाही. केवळ out-of-the-blue आल्याने एक कुतूहल, एवढेच.

(आधी म्हटल्याप्रमाणे) माहिती आणि संदर्भ म्हणून लेख छानच आहे. उचलेगिरी आणि कॉपीराईट-उल्लंघन यांच्यातील सूक्ष्मभेद (nuance) बऱ्यापैकी समजेल/पटेल असा मांडता आला आहे.

मूळ लेखकाचे श्रेय लाटण्याचे प्रकार कमी झाले तर उत्तमच.

सहमत.

वाक्यविन्यासात(सिंटॅक्स) आणि शब्दांत लहानसहान बदल करून लेखन करणाराही उचलेगीरच.

एक शंका: हा नियम बहुधा इतक्या universally लागू करता येणार नाही असे वाटते. एक कोपरखळी किंवा विडंबन म्हणून असे लहानसहान बदल करून लेखन करणे म्हणजे उचलेगिरी होईलच, असे म्हणता येणार नाही. उदाहरणादाखल केशवसुत-केशवकुमारांची classic textbook case घ्या. (तशीही आम्हाला शाळेत पाठ्यपुस्तकातच होती म्हणा!) केशवसुतांच्या "आम्ही कोण"चे विडंबन केशवकुमारांनी "आम्ही कोण" म्हणूनच केले. (किंबहुना 'केशवकुमार' हे टोपणनावसुद्धा 'केशवसुत'चे विडंबनच असावे.) असे करताना केशवकुमार मूळ कवितेचे (किंवा मूळ टोपणनावाचेसुद्धा) श्रेय केशवसुतांना देण्याचा फंदात पडले नाहीत - त्यांचा रोख कोठे होता, ते उघड होते. पण (केवळ श्रेय [उघडपणे] दिले नाही) म्हणून केशवकुमारांनी उचलेगिरी केली, असे म्हणता येणार नाही.

- टग्या.