चक्रपाणीजी, निरंतर दखल घेत राहिल्याखातर धन्यवाद!
आस्वादक जेवढा अधिक चोखंदळ तेवढी कलाकाराची प्रतिभा उजळत जाते. मनोगतावर तसेच इतरत्रही मला ज्या सूचना आस्वादकांनी केल्या त्यानुरूप सध्याचे बदललेले रूप खालीलप्रमाणे आहे. भविष्यातही बदल करण्यास मी अनुकूलच राहेन. खरे तर पूर्णत्वास येण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच असते.
आता पाहा कसे वाटते?
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू | तुझे स्मितहास्य, कहर जाहले ||
न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी | कटाक्षांचे मिलन, कहर जाहले || धृ ||
तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी | ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की ||
आणि त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज | मला ऐकविणे, कहर जाहले || १ ||
कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते | कधी चालतांना, बिथरणे, उसळणे ||
हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे | उतरून चढविणे, कहर जाहले || २ ||
ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र | तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ||
ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी | तुझे धुंद होणे, कहर जाहले || ३ ||