उंदीर 'क्यूट' वाटण्यासाठी मला दुसरा (उंदरीणीचा?) जन्म घ्यावा लागेल!

हे मात्र अति झाल हं! 'अमिताभ आवडण्यासाठी जया (कि रेखा?) व्हायला पाहिजे' या धर्तीचे.

अस काही नसत, पाहिजे तर अशोक रावकवी, एल्टन जॉनला विचारा..तेव्हा पुढचा जन्म 'उंदराचा' ही चालू शकेल.

 'क्यूट' वाटण्यासाठी नाही, तरी उंदीर आवडण्यासाठी उंदरिणीचा/उंदराचाच जन्म घेण्याची आवश्यकता नाही. मांजरीचा/बोक्याचाही चालेल.

मांजरांनासुद्धा उंदीर आवडतातच की - खायला!

आणि 'क्यूट'बद्दल माहीत नाही, पण झाडावर चढून, तिथून पुणे टेलिफोन्सने (circa १९७०चे दशक - उत्तरार्ध) 'तात्पुरती' म्हणून कायम लोंबत ठेवलेल्या टेलिफोनच्या तारेवरची कसरत करून तिसऱ्या (पुणेरी परिभाषेत - इतरत्र [विशेषतः मुंबईत] दुसऱ्या) मजल्यावरील घरात शिरू पाहणारा (आणि शकणारा!) उंदीर हा 'एंटरप्रायझिंग' मात्र म्हटला पाहिजे.

तसेही घरात धुडगूस घातल्याबद्दल आणि नासधूस केल्याबद्दल उंदराचा कितीही राग आला, तरी त्याला हुसकावून लावताना* (बहुधा कुठल्यातरी खबदाडीत शिरून) मागे वळून जेव्हा तो आपल्या इवल्याशा डोळ्यांनी आपल्याकडे टुकूटुकू पाहतो, तेव्हा तो (एरवी कितीही घाणेरडा दिसत असला तरी) निश्चितच 'क्यूट' दिसतो!**

- टग्या.

* आमच्या आजीचा (आईची आई) फ़ेवरिट छंद! हातात काठी/केरसुणी/मिळेल ते शस्त्र घेऊन तोंडाने 'शूत्! शूत्!' असे आवाज काढीत उंदरामागे धावत असे. अर्थात उंदीर कसला दाद देतोय! मग पिंजरे वगैरे लावी. (या पद्धतीचा फारसा उपयोग होईल यावर आमच्या तीर्थरूपांचा विश्वास नसल्याने त्यांचे विषप्रयोग चालत. [अर्थात उंदरांवर!]) कधी उंदीर चुकून पिंजऱ्यात अडकलाच, तर त्याला घराबाहेर नेऊन सोडून दिल्यावर काही काळानंतर (बहुधा त्याच दिवशी) तो घरी परत येई. त्या मानाने विषप्रयोग सहसा यशस्वी होत. (मात्र त्यानंतर मुंबईच्या चाळीत अर्ध्याहून अधिक आयुष्य काढलेल्या आमच्या आजीला [पुण्याला फ्लॅटसंस्कृतीत आल्यावरसुद्धा] तो मेलेला उंदीर मागच्या खिडकीतून खाली - आणि दुसऱ्यांच्या अंगणात! - फेकण्यापासून परावृत्त करावे लागे. अशा वेळी तो उंदीर कागदात गुंडाळून कचराकुंडीत फेकून येण्याच्या विशेष कामगिरीवर अस्मादिकांची नियुक्ती होत असे.)
**'इवल्याशा', 'टुकूटुकू' वगैरे शब्दप्रयोगांबाबत 'प्लेज्यरिझम'चा आरोप साफ अमान्य!