'नशापाणी'साठीच 'निशापाणी' हाही पाठभेद ऐकलेला आहे. कदाचित 'रात्रीची जास्त होणे' मधल्या 'रात्री'चा या 'निशे'शी संबंध असावा.

उत्तराने समाधान झाले असेल, अशी आशा आहे.

- टग्या.

अवांतर: मोल्स्वर्थच्या शब्दकोशात निशा या शब्दाचा अर्थ 'रात्र' याबरोबरच 'नशा'/'मादक द्रव्य' असाही दिलेला आढळतो. नशा हा शब्दही त्याच अर्थाने दिला आहे.

तसेच निशापाणी हा शब्द 'अ काँप्रिहेन्सिव्ह ऑर ऍन इन्डेफ़िनिट टर्म फ़ॉर इन्टॉक्सिकेशन, अँड फ़ॉर इन्टॉक्सिकेटिंग लिक़र्स अँड ड्रग्ज' अशा अर्थी (नेमके मराठीकरण करणे अवघड आहे! 'नशापाणी'/'निशापाणी'खेरीज दुसरा शब्द आठवत नाही.) दिला आहे. मात्र 'नशापाणी' या शब्दाची नोंद आढळत नाही.