भोमेकाका व इतर मित्र,
आतापर्यंत लेखमाला जिथवर आली आहे त्या पायावर सांगीतिक स्नायूंची वाढ करण्यासाठी सरगम करायला सांगण्यात माझी चूक होते आहे असे विचारांती माझ्या ध्यानात आले. कारण त्याला "पट्टी" समजण्याची गरज आहे आणि तो  विषय पुढच्या लेखात येणार आहे. म्हणून तात्पुरता हा व्यायाम लांबणीवर टाकूया.
सध्या "ओळखा पाहू" वर भर दिलेला बरा.

पुढे जाण्यापूर्वी, मी ओळखा पाहू २ मध्ये दिलेल्या स्वरलिप्यांत एक चूक झालेली आहे. त्यात मंद्र व तार सप्तकातील स्वर बरोबर दाखवले गेले नाहीत. म्हणजे स्वर बरोबर आहेत पण ते निळ्या/लाल रंगांत किंवा अनुस्वार/रफार गाळून दिले गेले आहेत. आपल्यापैकी कोणी या चुका सुधारून बरोबर सरगम देईल का?

सुरुवातीच्या मानाने आता सहभाग काहीसा कमी दिसतो आहे. शास्त्रीय संगीतात सर्वांनाच स्वारस्य असणे अपेक्षित नाही, पण माझ्या लिखाणात विषय क्लिष्ट होऊ लागला ही परिस्थिती आली नसावी एवढीच आशा करतो. अजून माझ्या मते फारसा अवघड भाग आलेला नाही.
जे वाचक/विद्यार्थी (अजूनही) उपस्थिती लावताहेत त्यांच्या याविषयी प्रतिक्रिया मिळाल्या तर बरे होईल.

दिगम्भा