मा. राधिका,
आपला प्रतिसाद आवडला!
मंदार यांनी आपल्या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास का होउ नये? अथवा "अभ्यास व्हावा" असे म्हटले आहे.
परंतु विज्ञानप्रेरीत काही लोक सरळ "ते सगळे थोतांड आहे " असे जाहीर करून मोकळे होतात.
वरवरच्या "शब्दांच्या पलिकडचे" 'अर्थ' शोधण्याचे, समजुन घ्यायचे थोडेसेही प्रयत्न कष्ट न करता सरळ निष्कर्ष काढुन रिकामे होतात.
असो...
बाय द वे, आधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या भाकितांची अचूकता किती असते हे कोणी सांगेल का?
हम्म्म, बऱ्याचदा अनुभव येतो, रेडीओ वर सांगतात "आज मुसळधार पावसाची शक्यता..." आणि हमखास पाऊस येत नाही...
तेव्हा तथाकथित विज्ञानाला कोणी काही म्हणत नाही ...
भोमेकाकांशी सुध्दा सहमत!
आपला,
--सचिन