अगदी अचूक निर्णय. मी तर एक पाउल पुढे जाउन असे म्हणेन की असा अनुभव लग्नानंतर आला तरी हाच निर्णय योग्य ठरेल. आयुष्य सुंदर आहे आणि एकच आहे. एखादे नाते जर लोढण्यासारखे होत असेल तर ते संपवणेच इष्ट असते. दोघानाही नव्याने सुरवात करण्याची संधी मिळते. मला वाटते की आपल्या समाजात समाज काय म्हणेल ही (माझ्या मते हास्यास्पद) भीती सतत ठाण मांडून बसलेली असते आणि त्या भीतीपोटी अशी अर्थहीन नाती सांभाळण्याचा अट्टाहास दिसून येतो.
आणखी एका कारणासाठी मैत्रीचे खास अभिनंदन. मुळात पत्रलेखिकेने आपल्या जोडीदाराची कुवत अचूक ओळखली. सामान्यपणे अशी जाणीव दुर्मिळ, आणि प्रेमात पडल्यानंतरही ते भान रहणे हे त्याहुन दुर्मिळ. तेव्हढी समृध्द जाणीव तिच्यामधे (आणि त्यासाठी प्रथम स्वतः लेखिकेमधे) आहे हे स्वागतार्ह. निर्णयातील कणखरपणा त्यानंतर.
बाकी मग भारतीय पारंपारिक मनाला न पटले तरी फ़िकीर नसावी. पुढील लिखाणास शुभेच्छा.