पुलंच्या पाळीव प्राणी मधून
एकदा आमच्या घरात उंदीर झाले. पहावे तिथे उंदीरच उंदीर. पिंजरे झाले सापळे झाले. गोळ्या झाल्या. पण गोळ्या खाऊनही उंदीर टुणटूणित , जिवंत. पिपात मेले ओल्या उंदीर ही कविता ऐकून तर आम्ही पिंपे आणली. पण पिंपे ओली करायची की उंदीर ओले करून टाकायचे याबाबतीत आमच्या घरात मतभेद होते. शेवटी नाईलाजाने मांजर आणली.