मराठी ही ज्ञानभाषा झाली नाही, तर सांस्कृतिक सपाटीकरणात मराठीची टेकडी कधीच जमीनदोस्त होईल.
परंतु भाषा ही प्रवाहासारखी आहे. मराठीनेच ज्ञानोबा --> केशवसुत --> किर्लोस्कर --> माधव जूलियन --> नेमाडे --> दलित लेखक --> इंग्राठी असे अनेक भाषिक स्थित्यंतराचे टप्पे पाहिले. त्यात भाषा घुसळून निघाली. मग भाषेच्या अशा नैसर्गिक स्थित्यंतरांना विरोध करणारे आपण कोण? किंबहुना आपण करूच शकणार नाही.