>> जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण रोखायला आपापल्या भाषा सांभाळा
हा मुद्दा ठीक आहे. पण भाषेचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने सांगता येईल. भाषा ही माणसाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचे माध्यम आहे. हॉटेलमध्ये वेटरशी संवाद साधताना एकवेळ अन्य माध्यम वापरता येईल पण कथा, काव्य भाषेशिवाय कसे  लिहिणार? समजा संस्कृत सारखी भाषा नष्ट जाली तर त्यात लाखो लोकांनी गेल्या हजार वर्षात व्यक्त केलेले ज्ञानही नष्ट  होईल. म्हणूनच केवळ आपल्याच नव्हेत तर आपल्या शेजाऱ्यांच्याही भाषा सांभाळल्या, शिकल्या पाहिजेत असे मला वाटते.