तुम्ही आत्तापर्यंतच्या खेळाच्या आधारावर गुणक्रम द्यायला सांगितला... ज्यावेळी मी प्रतिसाद दिला त्यावेळे पर्यंत ब्राझिलचा एकच सामना झाला होता जो त्यांनी अगदी रडत जिंकला. (रोनाल्डो १० मीटर सुध्दा पळाला नाही त्या सामन्यात. तो नक्कीच प्रभावी विजय नव्हता) तीच गत त्यांची दुसऱ्या सामन्यातही होती पण रोनाल्डो ला काढून जेव्हा रोबिन्हो मॅदानात उतरला (अंदाजे ७० मिनिटे) तेव्हा कुठे ब्राझीलच्या खेळात जीव आला... त्यामुळे मी अजुनही ब्राझिलला ५ वा - ६ वा क्रमांक देइन. स्पेन जरी युक्रेन विरुद्ध खेळून ४ गोल मारत असेल तरी त्यांचा खेळ चांगला होता.... ज्या सहजतेने त्यांनी चाली रचल्या आणि गोल केले त्या वरुन ती नक्किच सेमीज पर्यंत जाउ शकेल आणि अजुनही मी त्यांना ब्राझिलच्या वर स्थान देइन (अगदी काल झालेला ट्युनिशिया विरुद्धचा सामना बघुन सुद्धा!).
माझ्यामते अर्जेंटिना अजुनही अव्वल आहे आणि ते कदाचित यावेळचे विजेते देखील... पण जर्मनी ही तितकीच चांगली टिम आहे... अर्थात जर्मनीचा बचाव अर्जेंटिनाच्या द्रष्टिने बऱ्यापॅकी कमकुवत आहे पण त्यांना होमक्राउड चा खुप आधार (ऍड्व्हान्टेज) आहे. इंग्लंड ची टीम कागदावर प्रंचंड बलशाली असली तरी आत्तापर्यंत त्यांनी प्रभावी खेळ केलेला नाही (भारतीय क्रिकेट टिम सारखी परिस्थिती आहे त्यांची).
मला वाटते (किंवा मला बघायला आवडेल) उपात्य फ़ेरीत अर्जेंटिना, जर्मनी, हॉलंड/ब्राझिल/स्पेन असतील. आणि अर्जेंटिना - जर्मनी अंतिम फ़ेरीत ... जर त्यांची उपांत्यफ़ेरीत गाठ पडली नाही तर ...
अर्थात हा फ़ुटबॉल आहे आणि इथे सर्वच अनिश्चित असते .... पण उत्तम खेळ नक्किच पाहायला मिळेल.
(आज इंग्लंड चा स्वीडन बरोबर सामना आहे. इग्लंड पुढच्या फ़ेरीत जरी आधिच पोहचली असली तरी आजचा सामना त्यांना हरुन चालणार नाही. आज जर ते हरले आणि दुसऱ्या क्रमांकाने ते पुढच्या फ़ेरीत गेले तर तिथे त्यांची बलाढ्य जर्मनी बरोबर गाठ पडेल.. म्हणजे संपलेच! पण तसे काही होणार नाही. आज इंग्लंड जिंकेल (कमीत कमी सामना बरोबरीत तरी सोडवेलच)... आज इंग्लंड्चा गेरार्ड आणि नेव्हिल दोघेहि उतरणार नाहीत पण रूनी - ओवेन ची जुनी यशस्वी जोडगोळी आणि बेकहॅम चे अप्रतिम अचुक पास कमाल करतील अशी आशा आहे.)
-स्वल्पविराम