म.ट. मध्ये आलेले हे विनोद मनोगतावर अनुने सुरू केलेल्या "तोडलेले तारे"  ह्या चर्चासत्रामध्ये आणि प्रतिसादांमध्ये असलेले विनोद आहेत, जे साधारण त्याच क्रमाने तिथे छापलेले आहेत. त्यामुळे तिथे मनोगताच्या संदर्भाचा उल्लेख माझ्यामते तरी आवश्यक होता.

आता प्रश्न उचलेगिरीबद्दल. विनोद हे बरेचदा इकडून तिकडून घेतलेले असतात, त्यामुळे अशा गोष्टीला उचलेगिरी म्हणावे अथवा नाही हा प्रश्नच आहे. वरील चर्चेतही मी तसा प्रश्नच केलेला आहे, विधान केलेले नाही. मात्र, मनोगतावरच्या क्रमानेच ते विनोद छापलेले असल्यामुळे ते मनोगतावरूनच घेतलेले आहेत हे स्पष्ट होते. मग एकाच ठिकाणाहून आणि त्या ठिकाणावरील एकाच चर्चेतून सर्व विनोद गोळा केलेले असताना प्रेरणास्थानाचा उल्लेख न करण्याला उचलेगिरी म्हणणे अगदीच चूक ठरू नये.

मामंजींनी हे विनोद म.टा. मध्ये लिहिलेले असल्याने शीर्षक चुकीचे आहे असे वाटत नाही.