हरीतात्यांनी आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड स्वाभिमान दिला. आमच्या चिमुकल्या हातांत जोमाच्या मनगट्या घातल्या. दुर्दैवाने आज हात वळावे तसे वळले नाहीत तरी प्रयत्न केल्यावर वळतील हा विश्वास कुठेतरी मनात आहे.
(वाक्य आठवते तसे लिहीले. कृपया दुरुस्त करावे.)
मी सांगितला ते लक्षात ठेव भाऊसाहेब. गॉड इज सफरिंग. आमच्या वाईफने काढलेल्या चिमट्यासारखे. चिमटा म्हणून दुखते, पण वाइफचा चिमटा म्हणून मजा पण येते.
(१००% पेस्तनकाका)
जॉनकाकाचे चांगले गुण अंत्यविधीच्या वेळी भाषणात सांगायची गरज नव्हती. आज त्याच्या अंत्ययात्रेत त्याचे गुण त्याला मानणाऱ्या लोकांच्या आसवांच्या हिऱ्यात तोलले जात होते.
(काय वाट्टेल ते होईल! हे माझे आवडते पुस्तक आहे.)
आपण आणि सानेगुरुजी माझे आदर्श आहात.- गटण्या
अरे पण मागच्यावेळी ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरुजी म्हणालास ना?- सेक्रेटरी
(सखाराम गटण्या)
'व्हाय, यू नो, पी. एल? तिथे मला सुक्या बांगड्याची आमली अन पेज मॅळतली. हांगा पैसा हा, पण ते ना.'
(अनेक वर्षे जकार्तात /इंडोनेशियात राहिलेला मंगलोरी मिस्टर रोज म्हातारपणी सर्व सोडून मंगलोरात रहायला जाऊ इच्छितो त्याचे त्याने सांगितलेले कारण.-पूर्वरंग)
नंदा, जगात देव नाही आहे रे! -पु. ल.
अरे, जगात काहीच नाही. जीवन जीवन आपण ज्याला म्हणतो ते जन्मल्यापासून मरेपर्यंत असं नुसतं आड येत राहतं. मग आपली समजूत घालायला आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. कोणी पैसा म्हणतो, कोणी बायको म्हणतो, कोणी आई म्हणतो, कोणी प्रेम म्हणतो..-नंदा
(नंदा प्रधान)