मनोगतचा वापर हा जास्त करून स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी होतो असे वाटते. मला मनोगतचा चांगला फायदा झाला आहे. वेगवेगळया विषयांतील लेख वाचणे, त्यावरील वेगवेगळ्या मनोगतींची वेगवेगळी मते वाचणे ह्यामुळे ज्ञान वाढते.
मुख्य म्हणजे माझी मध्यंतरी कमी झालेली वाचनाची सवय परत वाढीस लागली.
सध्याचे मनोगत किंचीतसे वेळखाऊ असे वाटते. सर्वच प्रतिसाद पुर्णपणे उघडुन दिसतात आणि पाने वाढल्याने प्रतिसाद विखुरल्यासारखे वाटतात.