राधिका,

चक्रपाणि गजल टंकलिखित करतो आहे हे तुम्ही सगळे सांगत होतात ते माझ्या संगणकाच्या ( आणि माझ्याही ! ) डोक्यात शिरत होतं गं पण मला शाब्दिक कट्ट्यात काहीच दिसत नव्हतं ( कदाचित टंकलेखन युनिकोडमध्ये चाललेलं असेल म्हणून ) ! म्या पडले तांत्रिकदृष्ट्या मुकी, बहिरी आणि काहीशी अंधही (!) !!! जरा लक्ष दिलं असतंत मज पामराकडे तर बरं झालं असतं ! कट्ट्याचं आयोजन करतानाच मी माझ्या अडचणी सांगितल्या होत्या.. तरीही...... :-(

माझ्या हॉस्टेलजवळच्या कॅफेमध्ये या आधुनिक सोयी नाहीत, त्यामुळे यापुढच्याही कुठल्या कट्ट्याला हजेरी लावता येईल अशी चिन्हे दिसत नाहीत. असो. पुढच्या कट्ट्यांसाठी मनापासून शुभेच्छा.