सध्या तरी मनोगतचे स्वरूप उपभोक्ताउदासकपेक्षा उपभोक्तात्रासद झाल्यामुळे मला स्वतःला तरी त्याचा मनसोक्त आनंद उपभोगता येत नाही याचे मनापासून वाईट वाटते.मधूनमधून ओळख पटवणे त्रासदायक आहेच शिवाय सर्व प्रतिसाद एकदम उघडण्यामुळे हवा तो प्रतिसाद शोधेपर्यंत दमछाक होते.मला इतर काही विशेष उद्योग नसल्याने निदान पुरेसा वेळ तरी असतो पण मिळणाऱ्या थोड्या उसंतीचा मनोगतावर विहार करण्यासाठी वापर करणाऱ्याना तर हा मोठाच कालापव्यय वाटेल असे वाटते.प्रशासक या अडचणीवर तोड काढतील असा विश्वास वाटतो.