रविवार दि. १८ जूनला शनि-मंगळ यांची युती झाली. त्याआधी म्हणजे १७ जूनच्या सकाळी आजतक ने यावर एक कार्यक्रम दाखवला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या ज्योतिषीला या युतीची फले विचारली. सदर व्यक्तीने सांगितले की ही युती कर्क राशीत होत असून कर्क ही जलराशी असल्याने पाणी शोषून घेईल आणि पावसाचे प्रमाण कमी होईल. तसेच वीजा कोसळून मोठ्या प्रमाणात प्राणहानी होईल. माझा फलज्योतिषावर विश्वास नाही. पण वीजांमुळे गेल्या २ दिवसात नेहमीपेक्षा अधिक प्राणहानी झाली आहे हे मान्य करावे लागेल. हा योगायोग मानुया. पण जे निरीक्षण माझ्या लक्षात आले ते मी येथे देत आहे. अशा प्रकारची खास वीजांपासून सावध राहण्याची चेतावणी वेधशाळाही देत नाहीत. आपल्याला काय वाटते?