या रिक्षाचालकाचे नाव श्री. राजेंद्र पोतदार. हे गृहस्थ टिळक-रोडवर रहातात. ('रामनाथ' पाशी)

पेशाने रिक्षाचालक आणि वृत्तीने कवी आहेत! आपल्या कविता लोकांपर्यंत पोहोचवायला त्यांनी अभिनव मार्ग निवडला आहे. आपले काव्य / ललित लेखन ते आपल्या रिक्षापाठिमागे लिहितात.

सध्या त्यांची 'शाळेचे दिवस' नावाची कविता 'रामनाथ विश्रांती गृहाच्या' बाहेर टांगली आहे.

त्यांची एक कविता (मला वाटते अपघातांविषयी) 'दुर्वांकुर'च्या चौकात फळ्यावर लिहिली होती.

 

मला इतकी माहिती असण्याचं कारण असं, की मी पूर्वी तिथेच रहात होतो. त्यांच्या कविता वाचत-वाचतच मी लहानाचा मोठा झालो आहे.