मटाच्या संपादकांना कळवून काही फायदा नाही.
हेच म्हणायचे होते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चर्पटचर्चा व्हायला हरकत नसावी.
माझीही.
केवळ अनुताईच नाहीत हे आपले वाक्य थोड्या वेगळ्या अर्थाने वापरते.
मनोगतावरच अनेक ठिकाणी उचलेगिरी चालते हे दिसून आले आहे. ही उचलेगिरी एकमेकांची नसावी परंतु कुठल्याशा इ-पत्रांतून उद्धृत केलेली असावी.
एक चांगल उदाहरण नुकतेच दृष्टिस पडले
यात एकमेकांकडून उचलेगिरी झाली असे मला म्हणायचे नाही पण उचलेगिरी आहे हे सत्य, कारण एकाही लेखकाने...नुकतीच वाचलेली, ऐकण्यात आलेली अस लिहिलेल नाही. याचा अर्थ वरिल साहित्य आपल्या नावावर खपवले असा होतो अस मला वाटत.
हे बहुधा अनवधानाने झाले असावे. पण प्रत्येकाने जागरुक रहायला हवे.
असो. तुमच्या उचलेगिरी विषयीच्या सुरेख लेखाने हे सगळे डोक्यात आले. लेखांच्या लेखकांना दुखवण्याचा हेतू नव्हता. मला स्वतःलाही त्यामुळे वारंवार पारखून पहाता येईल.
प्रियाली