संजोप राव,
एका महत्वाच्या समस्येवर चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
आपले विचार पूर्णपणे पटले. मला कधीकधी एका गोष्टीचे नवल वाटते. प्राचीन भारतामधे सेक्सबद्दल बराच खुलेपणा होता. कामसूत्र किंवा खजुराहो याची उदाहरणे आहेत.
त्यानंतर आताच्या दुटप्पीपणापर्यंतचा प्रवास कसा आणि का झाला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरे म्हणजे आपल्या देशातील लोकसंख्यावाढीचा या प्रश्नाशी जवळचा संबंध आहे असे वाटते.
प्रश्न जटील आहे. निदान मनोगतावर या संबंधी खुली चर्चा झाली, सर्वांनी आपले विचार मोकळेपणाने मांडले तरी या दिशेने अगदी सूक्ष्म का होइना, एक पाउल पडल्यासारखे वाटेल.