नाना,

तुमच्या कवडीचीही किंमत नसणाऱ्या सभ्यतेला कोण विचारतो? तुमच्याप्रमाणे "कवडीचीही किंमत नाही त्या बाईला," असे सर्वच जण म्हणतात. पण मिडियाने (विशेषतः electronics) त्याचेही कोट्यवधीचे भांडवल केले. राखीच्या चुंबनापेक्षा मिडियाने केलेली त्याची जाहिरात तशी जास्त धोक्याची वाटते. एरवी या विषयाला इतकी प्रसिद्धी मिळालीच नसती.  फिल्मी क्षेत्रात असे चाळे केवळ आजच चालतात असे नाही, तर पूर्वीही असे नट ( अगदी नट्याही ) होते. मात्र त्यांच्या चाळ्यांना प्रसिद्धी मिळत नसे. मला नेमका संदर्भ आठवत नाही, पण बहुधा व्ही‌. शांताराम यांचे ते आत्मचरित्र असावे. त्यात लेखकाने एक नटी  काहीही कारण नसताना विशिष्ट व्यक्तीला पाहताच पदर ढळवित असे, असा स्पष्ट उल्लेख  केलेला आहे.विशेष म्हणजे ती नटीही मऱाठी चित्रपटातील एक गुणवान अभिनेत्री मानली जाते. थोडक्यात, फिल्मी वातावरण बदललेले नाही. मिडिया मात्र नको इतका आक्रमक झाला आहे. भविष्यात हा धोका आणखीनच त्रासदायक होईल, ही चिंता सतावते.

अवधूत.