मामंजी वर्तमानपत्रात काय छापतात यावर माझे बंधन नाही. पण माझ्या लेखाचा उल्लेख आला म्हणून हा डिसक्लेमरः
चर्चेतील 'डुर्र' आणि 'आम्लराज अल्कराज' हे प्रत्यक्ष पाहिलेले/ऐकलेले आहेत. (दहावीचे पेपर तपासायला येतात त्यात स्वतः आम्लराज अल्कराज वाचले आहे.) डुर्र हे एका कुटुंबातील व्यक्तीकडून ऐकलेले आहे. 'गांडूळ' लहानपणी वडीलांकडून ऐकलेले आहे. 'उचलेगिरी' करण्याचा कोणताही उद्देश नाही. पण जर हे विनोद मी 'सुचून' शोधलेले नसतील तर माझी 'स्त्रोतः अज्ञात' हा उल्लेख करायला कोणतीही हरकत नाही. (विनोदात स्त्रोत सांगावा लागणार नाही असं वाटतं , पण असो.) तर यापुढे स्त्रोताचा उल्लेख प्रत्येक बाबतीत कटाक्षाने पाळला जाईल.
(मीच लिहीलेल्या खारोळ्या नाव काढून प्रिंट स्क्रीन करुन माझ्याच मैत्रिणीला इपत्रातून आल्या होत्या, आणि तिने 'गुड वन..मस्ट रीड' म्हणून त्या मला पाठवल्या. विनोदाचे जाऊद्या, पण मनोगतावरुन उचलणे खूप सोपे आहे आणि वेळोवेळी नावाशिवाय कृती उचलल्या जातात असा अनुभव आहे.)