रोहिणी
वृत्तांत छान आहे. या वृत्तांतामुळे पुढच्या इ-कट्ट्याला याहून जास्त संख्येने मनोगती उपस्थित राहतील अशी खात्री वाटते.
खूप मजा आली इ-कट्ट्याला. सुरुवातीला जरा गोंधळ होता. पण नंतर सुमधुर गीतांची बरसात कट्ट्यावर व्हायला लागली तसा कट्टा अधिकाधिक रंगत गेला.सातीच्या इ-चहा आणि इ-बटाटेवडे यामुळे हा रंगतदार कट्टा लज्जतदारही झाला.
इ-कट्टयाचा शुभारंभ केल्याबद्दल भाष आणि वेदश्रीचे मनःपुर्वक आभार. चक्रपाणिच्या युक्तीमुळीच सगळ्यांना गाणी ऐकू येऊ लागली. त्याबद्दल त्याचेही आभार. इ-कट्ट्यात सहभागी होऊन गाणी ,विनोद इ. नी कार्यक्रमाला रंगत आणल्याबद्दल सर्व सहभागी मनोगतींचे आभार.
पुढील इ संमेलनात कार्यक्रमाची रुपरेषा आधीच ठरवली तर अधिक सुरळीतपणे संमेलन साजरे होईल याची खात्री आहे.
सहमत.
-संवादिनी