रीडर्स डायजेस्ट च्या यादीत बहुधा पुण्याचा समावेश नसावा ! नाहीतर मुंबईची काय बिशाद पुण्याच्या पुढे जायची (या बाबतीत !)
टीपः पुणेकरांनो जरा हलकेच घ्या हो !
सहमत.
मुंबईकर पुणेरी उर्मटपणाच्या पासंगालाही पुरणार नाहीत असे माझे (उर्मट) मत आहे. 'गुड मॉर्निंग' ला उत्तर म्हणून 'कस्लं बोडख्याचं गुड मॉर्निंग?' हे मी स्वतः ऐकले आहे ( शब्द लिहिल्याप्रमाणेच वाचावेत ). बँकेतल्या ठेवीची पावती मुदतपूर्व मोडत असताना अर्जात ' पावती मोडण्याचे कारण' या सदरात 'टू परचेस शनिवारवाडा' असे मुंबईकर लिहू शकतील काय?