स्वा. सावरकरांनी बरेच प्रतिशब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही रोजच्या बोलीत पेन, फोन , टीव्ही, कंप्युटर, रेडियो असे कितीतरी शब्द रूळले आहेत त्याचे काय करायचे? तिथे मराठी शब्दांचा अट्टाहास करणे योग्य ठरेल का? तुम्हीच सांगा.

मंदार,
'मनोगत'वर मराठी शब्दांच्या वापरासाठी आग्रह नाही धरणार तर मग कुठे धरणार ? (दूरध्वनी,भ्रमणध्वनी,दूरदर्शन/चित्रवाणी संच,संगणक इ शब्द आता सर्रास वापरले जातात.) मनोगतवर लिहिताना मराठी शब्दांचा माहीत नसल्यास प्रयत्नपूर्वक मिळवून नंतर तोच शब्द मनोगतवर लिहिण्याचा निश्चय आपण स्वतः पुरता केल्यास मनोगतचा उद्देश सफल होईल.
अन्यथा,'मराठी वर्डस रिमेंबर करायला डीफीकल्ट जातं' किंवा 'इफ वी महाराष्ट्रीयन्स डोंट स्पीक मराठी ,देन हाऊ मराठी विल सर्व्हाइव' इ.वाक्य कानावर पडतातच की!

जयन्ता५२