अमेरीकेत गेले की शिष्टाचाराच्या गप्पा मारणारे अनेक बघितले आहेत.

मी कुठे अमेरिकेचे नाव काढले?

दुसरे असे.... रिडर्स डायजेस्टला किती महत्व द्यायचे हे ठरवा आधी... उठ सुठ कोणीही नावे ठेवते भारताला, भारतातल्या गोष्टींना, आणि तुमच्यासारखे नको तेवढी प्रसिध्दी देते. या पेक्षा "रिडर.." ला याचा जाब विचारला असतात तर बरे झाले असते...

मी कुठे रिडर्स डायजेस्टला मह्त्व दिले? तस असत तर मी मूळ रि. डा. च्या बातमीचा स्त्रोत दिला असता. मी फक्त बातमी दाखवली. तिला प्रसिद्धी भारतातल्याच सर्व वृत्तपत्रे आणि संकेतस्थळांनी दिली आहे. मी ही म.टा. आणि रिडिफच दाखवले.

जिथे माझी धारणा बातमी कडे करमणूक म्हणून बघावी अशीच आहे तिथे जाब विचारायची गरज काय?

आणि आपल्याकडे असल्या शिष्टाचारांपेक्षा अजुन बरेच चांगले शिष्टाचार आहेत ते सगळ्या जगापेक्षा बऱ्याच पटीने चांगले आहेत , त्यांची कधी तरी वाहवा करायला शिका... दुसऱ्यांची "री" अशीच पुढे ओढत बसण्यात गंमत ती काय?

मी ही सहमत. पण मी री ओढली असे दाखवा पाहू.

----

अमेरिकेत गेलेल्यानी फार मोठे दुष्कर्म केले आहे असा विचार करुन आणि ते भारताला कमी लेखत आहेत असा न्यूनगंड स्वतःच्या मनात भरवून, अमेरिकेचे नाव काढलेले नसले तरी उगीचच अमेरिकेची री ओढून ताणून स्वतःची चूक न मानता उगीच वादाला वाद वाढवणे आपल्याला आवडते हे आधिच लक्षात आले होते तेव्हा यापुढे

हा. घ. तों. बो.