दोन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असणे वा नसणे हा संपूर्णपणे त्या त्या जोडप्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे, हे मान्य.
हे मान्य केल्या नंतर यावरून मनोगतींची मते घेऊन त्यावर सामाजिक मत कसे काय पहाता येईल हे कळले नाही.
शिवाय तुमच्या पहिल्या प्रश्नात असलेले ' भावी जोडप्यांमध्ये ' हे शब्द गोंधळात टाकणारे आहेत. जर शरीर संबंधांनंतर त्यांना भावी जोडपी म्हणून राहणे अनिवार्यच असेल तर असे संबंध असले काय नसले काय काहीच फरक पडत नाही. म्हणून २ व ३ क्र. चे प्रश्न निरर्थक ठरतात. जर विवाहपूर्व संबंधांनंतर भावी जोडपे म्हणून राहायचे की नाही हा निर्णय घ्यायचा असेल तर गणित बदलेल असे दिसते. नाही तर तुम्ही केलेल्या भारतीय संस्कृती वगैरेच्या उल्लेखामुळे तुम्हाला 'नसावेत' हे एकमेव उत्तर अपेक्षित आहे की काय असे वाटते.
छाया