विश्वासराव
वरील प्रश्नांवर आपले मत नोंदवताना सध्या तरी फक्त भारतीय संस्कृतीच्या दृष्टीतूनच विचार व्हावा अशी विनंती.
हे कसं शक्य आहे बुवा?
जेव्हा मी माझे मत बनवतो तेव्हा त्यामागे अनेकविचार असू शकतात.
हॅम्लेटरावांशी सहमत.
तेव्हा या विषयाचा विचार करताना भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीची तुलना आवश्यक आहे असे वाटते.
पाश्चात्य संस्कृतीत विवाहपूर्व संबंध समाजमान्य असतात तसेच त्यातुन निर्माण झालेल्या संततीलाही समाजमान्यता मिळते. अशा संततीचे पालनपोषण करावयास त्यांचे जीवशास्त्रीय पालक आई वडिल दोघेही तयार असतात.
भारतात मात्र सामान्यपणे असे चित्र दिसत नाही. अशा संबंधातून जन्मास आलेल्या मुलांना अनौरस दर्जा दिला जातो. नीना गुप्ता सारखे अपवाद असतीलही पण ते पैसे आणि उच्चभ्रू राहाणीमानामुळे शक्य आहे.
भारताच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास असे वाटते की ज्या तरुणांना असे विवाहपूर्व संबंध ठेवायचे आहेत त्यांनी तसे ठेवायला हरकत नाही पण त्या आधी होणाऱ्या संततीबद्दल विचार जरूर करावा.उद्या जबाबदारी झटकून भ्रूणहत्या आणि अनाथालयांची संख्या वाढायला नको.
तसेच भारतात योनीशुचितेलाही महत्व दिले जाते. अर्थात किती महत्व द्यायचे किंवा द्यायचे का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतू असे संबंध म्हणजे तरुणपणात मौजमजेचे साधन असे त्याला स्वरूप यायला नको. नाहीतर स्वतः मौजमजा करुन स्वतःची होणारी पत्नी मात्र कौमार्यावस्थेत असली पाहिजे अशी अपेक्षा करणारे महाभागही कमी नाहीत.
कुमारीमातांना व अशा संततीला वेगळी वागणूक न देता समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करुन घेतले पाहिजे.
जबाबदारीची जाणीव ठेवून असे संबंध ठेवण्यास हरकत नसावी असे वाटते.
आपला
तिंबूनाना