दोन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असणे वा नसणे हा संपूर्णपणे त्या त्या जोडप्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे, हे मान्य.

चर्चेचा रोख चर्चेच्या प्रवर्तकाला हव्या असलेल्या दिशेला ठेवण्यासाठी त्यांनी हे वरील विधान केले असावे असे वाटते.

"दोन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असणे वा नसणे हा त्यांचा व्यक्तिगत मामला आहे की नाही" या मुद्द्यावर इथे चर्चा अपेक्षित नाही असे वाटते.

नजीकच्या भावी जीवनात पती-पत्नी या नात्याने एकत्र राहण्यास सुरुवात करण्याआधी समजा तुमच्या...

१) भावाने किंवा बहिणीने
२) मित्राने किंवा मैत्रिणीने
३) भाच्या-पुतण्याने किंवा भाची-पुतणीने
४) मुलाने किंवा मुलीने
५) समवयस्क काका-मामाने किंवा आत्या-मावशीने
६) ओळखी-पाळखीतल्या कोणी जोडप्याने
७) शेजार-पाजार मधल्या कोणी जोडप्याने

...विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवले असता तुमच्या मनात, एक जवळची आणि/किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणून, काय विचार येतील हे जाणून घेणे या चर्चेचे उद्दिष्ट आहे असे वाटते.