इसम मजकुर यांचा आपला आंबट शौक पुरा करण्यासाठी भल्याभल्यांची डोकी भिडवून दुरून साठमारीची मजा लुटण्यापलीकडे फार मोठा हेतू प्रस्तुत चर्चेचे गुऱ्हाळ लावण्यामागे दिसुन येत नाही. कारण त्यांची ती तथाकथीत पुरोगामी आजच्या क्षणिक सुखासाठी उर्वरीत आयुष्य पणाला लावणारी सज्ञान सुज्ञान वगैरे सखी प्रेयषी की आणखी कोणी सदरच्या चर्चेत कुठेच का आढळुन येत नाही ? तिला या महशयांसारखे एवढे गहन प्रश्न पडले नाहीत का ? आपले मौलिक कार्य या मर्त्य समाजासमोर मांडून समाजाच्याच थोतरीत लगावण्याची हिंमत यश्किंचित राखी सावंत करु शकते तर ह्या बाईसाहेबांचा हात किंवा तोंड कोणी धरले ? 

        सदर महाशय आपल्या कुटुंबियांना मागासलेपणाची शिवी देवुन स्वताला कोण व काय सिद्ध करू इच्छितात ? एवढे मनोगती त्यांच्या या हिणकस वा तुच्छ काव्याला बळी कसे पडले याचेच मोठे आश्चर्य वाटले