यातील भैरू मला कांबळेंच्या स्तंभात वाचल्यासारखा वाटतो.
द्येवाशप्पत सांगते छत्रपतीम्हाराज, हा नाशिकच्या वर्तमानपत्रातला भैरु मी वाचलेला नाहिय. 'भैरु' हे नाव मी मला आठवत असलेल्या 'पहाट झाली, भैरु उठला' या बालभारतीतील धड्यावरुन घेतला आहे. आणि 'एनी टॉम,डीक,ऑर हॅरी' असा नायक दाखवण्यासाठी.
कृपया या भैरुचे कोणाही इतर लेखकाने लिहीलेल्या भैरुशी साम्य आढळल्यास हा योगायोग समजला जावा. वरील लेख हा कोणत्याही साहित्यातून उचलेगिरी करुन जन्मलेला नाहिय, ती लेखिकेची स्वतःची निर्मीती आहे असे १००% छातीठोकपणे सांगते.