टीपः माझ्या मते, हिंदीचे हे आक्रमण इंग्रजीपेक्षाही अधिक भयावह आहे कारण यात मराठीचा मूळ बाजच नष्ट होतो.
हे काही पटले नाही.असे का बरे? एका संपन्न, सुसंस्कृत, देशी भाषेपेक्षा तुम्हाला एक परकीय भाषा का जवळची वाटते बुवा? एका भाषेचे दुसऱ्या भाषेवर आक्रमण कधीही अयोग्यच, ते थांबवायला हवे हे मान्य केले जाऊ शकेल पण हिंदीपेक्षा इंग्रजी बरी हे मात्र पटणारे नाही. हिंदी ही भारतीय भाषा आहे नि शिवाय ती मराठीप्रमाणेच संस्कृतशी जवळीक साधणारी आहे, तेव्हा इंग्रजीपेक्षा हिंदी शब्द वापरलेले कधीही चांगले, कारण ते वाचणाऱ्या एखाद्या अडाण्यासही समजू शकतात.
उदाहरण म्हणून 'प्रधान सचिव, शिक्षा अभियान' हे शब्द घेऊन काही वाक्ये तयार करा. आता या शब्दांच्या ठिकाणी इंग्रजी शब्द वापरून नविन वाक्ये तयार करा नि मग ती वाक्ये नि हिंदी शब्द असलेली वाक्ये यापैकी कोणती समजण्यास सोपी हे आपणच ठरवा .
बाकी, अमित यांच्या मूळ मुद्द्याशी मी सहमत आहे.(जे वर आलेच आहे.) एका भाषेत दुसऱ्या भाषेतील शब्दांची सरमिसळ केल्याने त्या भाषेचा बाज नष्ट होतो हे मान्य. एकूणच आजकाल पत्रकार भाषेबाबत बेपर्वा होत चालले आहेत असे दिसते.
एक वात्रट