नमस्कार मनोगती,

मुंबईवर बरीच चर्चा होत आहे. वाचून आनंद झाला.

मुंबईमधील वाहतूक व्यवस्था बरीच शिस्तबद्ध आहे पण हॉर्न चे काय? समोरचा चालक हा जणु झोपलेला आहे आणि त्याला उठवण्याची जबाबदारी आपलीच आहे या थाटात मागचे चालक कर्कश्य हॉर्न वाजवित असतात. पादचारी ही वाटेल तसे रस्ते ओलांडतात. या बाबतीत परदेशातील स्थिती काय आहे? तिथे म्हणे हॉर्न वाजवणे गुन्ह्यासमान मानले जाते.

आपण केलेल्या वर्तणुकीमुळे जर इतरांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ही त्रास होत असेल तर ते वर्तन ही असभ्यच नाही का? (गुटखा वगैरे यात आले). असे अनेक मुद्दे आहेत.

पाश्चात्यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. पण त्यांच्या चांगल्या गोष्टी घेण्यास काय हरकत आहे? शक्य असल्यास पोगो वरील गॅग्स फॉर लाफ्टर हा कार्यक्रम पहावा. लोक कसे कायद्याला, पोलिसांना घाबरतात आणि किती पापभीरू आणि संयमी असतात ते दिसून येईल. हा बहुधा कॅनडा मधील कार्यक्रम आहे.

एखाद्या वाईट प्रवृत्तीविरूद्ध आवाज उठवणे आणि स्पष्टावक्ता असणे यात काही गैर आहे असे वाटत नाही. असे लोक कदाचित उर्मट वाटू शकतात. ज्याला इंग्रजीत ऍरोगंट म्हणता येईल. याच न्यायाने काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रिया तेंडुलकरांनी  सादर  केलेली रजनी उद्धट म्हणता येईल का? नक्कीच नाही. पण लोकांचा तसा गैरसमज होऊ शकतो.

मी पाठवलेल्या मतावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे ,शुक्रिया!!! (अगदी मनापासून)

 - आपला सच्चा (जन्माने , कर्माने , धर्माने) नम्र  मुंबईकर.