बहुतेक सर्व पत्रकार स्वतःला 'बुद्धिवादी' समजत असतात (!) आणि यातूनच खरा घोळ होतो.  कारण मग मजकूराच्या किंवा भाषेच्या उच्च गुणवत्तेबद्दलही त्यांची आधीच खात्री झालेली असते.  स्वतःबद्दलच्या या उदात्त कल्पनांमुळेच हे लोक कुठल्याही भाषेतले शब्द कुठल्याही भाषेत घालायला डगमगत नाहीत.  खरा प्रश्न वृत्त संपादक किंवा संपादक हे आपल्या वृत्तपत्राची बाह्य समाजात चांगली प्रतिमा रहावी म्हणून कितपत आणि काय काळजी घेतात हा आहे.  दुर्दैवानं अशी काळजी घेतली जाताना फारशी दिसत नाही.