हा विषय बघून इथे आले आणि वेगळीच चर्चा वाचायला मिळाली. चर्चा पण तशी चांगलीच शिळी झाली आहे पण तरी एकदोन गोष्टी स्पष्ट कराव्याश्या वाटल्या म्हणून ही उठाठेव..

>>उद्या म्हणूनच, कुणी 'श्वास' पासून प्रेरणा घेऊन पूर्णपणे ईंग्लिशमधून बोलणार्‍या मराठी व्यक्तीरेखांवर चित्रपट काढला तर त्यात काही वावगे होईल असे मला वाटत नाही.<<

श्वास इंग्रजी मधे नव्हता हो. मराठीतूनच होता.

>>"श्वास"च्या निर्माता - दिग्दर्शकांना सत्यजित रे,अमोल पालेकर, सई परांजपे, विजया मेहता यांच्या मार्गाने न जावेसे वाटता आशुतोष गोवारीकर (लगान), संजय लीला भन्साळी (देवदास) यांच्या खर्चिक (तेही ऐपत नसताना ) मार्गाने जावेसे का वाटते हे मला कळत नाही.<<

>>आपल्या सर्वांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहीजे की 'श्वास'चे निर्माते/दिग्दर्शक,  आशुतोष गोवारीकर (लगान), संजय लीला भन्साळी (देवदास) ह्यांच्या मार्गाने जात नाहीएत. 'लगान' आणि 'देवदास' हे चित्रपट त्या-त्या निर्मात्यांनी स्वनिर्णयाने 'ऑस्कर' साठी पाठविले होते. 'श्वास'च्या निर्मात्यांनी/दिग्दर्शकानी 'तसं' केलं नाही. 'श्वास' हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 'ऑस्कर'साठी 'भारताची एंट्री' म्हणून पाठविला आहे.<<

>>अमोल पालेकरच्या अनकहीला, सई परांजप्यांच्या स्पर्शला राष्ट्रीय  पुरस्कार मिळाले होते. विजया मेहतांच्या "रावसाहेब" चा पुरस्कार थोडक्यात हुकला <<

वरील तीनही विधानांमधे थोडासा बेसिक किंवा तांत्रिक (टेक्निकल) घोळ आहे.

१.'श्यामची आई' नंतर राष्ट्रीय पुरस्कार अनेक मराठी चित्रपटांना मिळाले परंतू ते सर्व रजतकमळ पुरस्कार होते. जे प्रत्येक भाषेतील उत्कृष्ट चित्रपटासाठी दिले जातात. 'श्वास' ला मिळाला तो सुवर्णकमळ पुरस्कार होता जो संपूर्ण देशातून एकाच चित्रपटाला मिळतो. 'श्यामची आई' ला हा पुरस्कार होता आणि नंतर 'श्वास' ला.

२. लगान वा देवदास अथवा ऑस्करसाठी भारताकडून पाठवली जाणारी कुठलिही फिल्म ही फिल्म फेडरेशन ऑफ इंडीयाकडूनच पाठवावी लागते. अन्यथा ऍकॅडमी तिचा स्वीकार करत नाही. भारताकडून पाठवली गेलेली फिल्म ही 'फॉरेन फिल्म कॅटेगरी' मधेच येते. तसेच 'श्वास' ही पहिलीच मराठी फिल्म ऑस्करला जात होती त्यामुळे आमच्या आधी मराठी सिनेमा ऑस्कर ला जाण्यासाठी पालेकर, सई परांजपे वा बाई यांनी कुणीही वाट तयार करून ठेवली नव्हती.  खर्चिक वा अखर्चिक वाट असा काही प्रश्नच येत नाही कारण काही बेसिक गोष्टी तुम्हाला तुमची फिल्म तिथे डोळ्यापुढे असावी यासाठी कराव्याच लागतात. आणि त्यासाठी डॉलर्समधे खर्च येतो.

३. श्वास आम्ही मराठीतूनच केली होती हो. त्याला फक्त इंग्रजी सबटायटल्स होती.

बाकी ऑस्करवारी आणि इतर गोष्टींबद्दल पुन्हा केव्हा तरी कारण श्वास चे कॅम्पेन मॅनेज करण्यात माझा बराच सहभाग होता त्यामुळे मजकूर १०-१२ पाने तरी होईल. पण तेवढे टाइप करण्याएवढा पेशन्स आणि वेळ सध्यातरी माझ्याकडे नाहीये.

नीरजा