चर्चा बरिच इंटरेस्टींग आहे. मराठी चित्रपटाविषयीची चर्चा असूनही जब्बार पटेल यांचा उल्लेखही झाला नाही याचे आश्चर्य वाटले. एकामागून एक तमाशापट निघत असताना जाणीवपूर्वक सामना, सिंहासन, उंबरठा असे चित्रपट काढणे उल्लेखनीय आहे.
ह्याप्रमाणेच श्याम बेनेगल यांचा अनुल्लेखही खटकला.
दुसरे म्हणजे फ़क्त ऑस्करसाठी सत्यजीत रे आणि संजय लीला भन्साली यांना एकाच मापाने तोलणे हा सत्यजित रेंवर मोठा अन्याय आहे.
नीरजा यांनी म्हटल्याप्रमाणे भूमिकेसाठी कष्ट केले आहेत अशी उदाहरणे फारशी आढळतनाहीत. एखादा नसिरुद्दीन स्पर्श साठी कष्ट घेतो. बाकी सर्व कभी खुशी कभी गम.
मला अजून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ग़ांधी सारखा सब्जेट आपल्या मातीत असूनही एका ब्रिटिशाने त्यावर सुंदर कलाकृती काढून पोत्याने ऑस्कर मिळवावेत?

चर्चेचा मूळ मुद्दा ः हिंदी चित्रपटातील मराठी पात्रे - नुकतेच पाहिलेले उदाहरण म्हणजे रामगोपाल वर्माचा सरकार. यातही अमिताभ एखादेच वाक्य मराठीतून बोलतो.