बोकीलांचे 'उदकाचे आर्ती' वाचले तेंव्हा अगदी राव म्हणतायत तसेच झाले होते. फारच सुंदर कथासंग्रह.

भाषेबद्दलही अगदी सहमत. माझा एक मित्र मध्ये माझ्याकडे आला असताना मला जाणवले की त्याच्या बोलण्यात काही वेगळेपणा जाणवतोय. मग लक्षात आले की तो एकही इंग्रजी शब्द बोलत नाही.  आपण अगदी नकळत या शब्दांचा वापर करतो. जसे त्याची काही वाक्ये होती -  मैदानावरून पळणे चांगले. (यावेळी मी ग्राउंड मध्ये जॉगिंग असे म्हणालो होतो). तसेच (कंसात इंग्रजी शब्द) रस्ता (रोड), गगनचुंबी इमारत (skyscrappers), समस्या (प्रॉब्लेम), सोपे (सिम्पल) असे काही शब्द. जे शब्द इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने वापरात आले आहेत. जसे मोबाइल, फोन, त्यांना एखादा अवघड मराठी शब्द शोधून तो वापरणे हे पटण्यासारखे नाही. कारण हे शब्द तितकेसे सोपे नाहीत आणि हे इंग्रजी शब्द आपल्या भाषेत सामावलेले आहेत. त्यापेक्षा जे इंग्रजी शब्द तंत्रज्ञानाशी संबधित नाहीत (विशेषणे, काही नामे) आणि ज्यांना पर्यायी सोपे मराठी शब्द आधीपासून वापरात आहेत त्यांचा वापर खुंटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

- ओंकार.