समीर,
तुमचा अगदी चांगलाच अभ्यास झाला आहे.
सुरुवातीचे काही दिवस नवीन नवरी जास्त माहेरचा आणि स्वतःचा विचार करत असते जे की अत्यंत स्वाभाविक आहे. आई-वडिलांना, भावा-बहिणींना, घरा-दाराला आणि जिथे आपण वाढलो, शिकलो, आईच्या कुशीत शिरलो-रडलो, बाबांनी प्रेमाने आणलेला खाऊ खाल्ला, भावासाठी प्रेमाने स्वयंपाक केला, त्यांना राखी बांधली, बहिणींची वेणी घालून दिली, डोळ्यात अश्रू दाटी करून आल्यावर आई-बाबांच्या मायेने पाठीवर फिरणाऱ्या हाताची ऊब अनुभवली अशा घराला सोडून पूर्णपणे अनोळखी लोकांमध्ये मिसळून जायचं, त्यांना आपलं मानायचं, त्यांची सुख-दुःखे आपली जाणायची, सासू-सासरे काही बोलले तर निमूटपणे ऐकून घ्यायचं, त्यांच्यात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा सदोदित प्रयत्न करत बसायचा या भयंकर अवघड गोष्टी आहेत. त्या समजून घ्यायच्या म्हणजे त्यासाठी स्त्रीजन्मच घ्यायला हवा
बायकांचं मन ओळखलंय यातच सगळं काही आलं. लेख खूप आवडला.
मित्रांसोबतची मजा वेगळी आणि बायकोसोबतची धुंदी वेगळी!
अगदी मान्य!
अंजू