गावंढळ भाऊ, सर्वप्रथम ह्या जबराट नावाबद्दल अभिनंदन.
तुमचा हा खुमासदार आणि अणुकुचिदार टिका करणारा लेख आपल्याला पण जाम आवडला बुवा. आणि तो वाचत असताना रविवारची सकाळ मधल्या "मिसेस गद्रे आणि भगिनीमंडळ" ह्यांची आठवण आली.

"येस. पण तो स्टोरवाला एनी वन ला मोर दॅन टू बॅग्ज अलाव् करत नाही. लास्ट वीकेंडला मी दोन आणि हर्शीला दोन अश्या चार डिफ्रंट टाईमला जाऊन घेतल्या. ही डिडंट नोटिस... मी आज दोन घेतल्या. तरी टू मोअर रिलेटिव्हज राहिलेत. तर तू जाऊन दोन बॅग्ज बाय कर ना आमच्यासाठी...."

हे वाचून तर "हल्ली सारखं सारखं फ्रेंचच येत असतं अगं तोंडावर" सारखे संवाद आठवले, आणि त्यामुळे तुमच्या लेखनाचा दर्जा पुलंच्या लेखनाची आठवण करून देणारा आहे, हे ही जाणवले. लिहीत रहा, मजा आली!