छान लेख.
त्यामुळे लग्नानंतरचा जो एकमेकांना ओळखण्याचा, एकमेकांच्या वृत्ती, आवड, निवड, स्वभाव, विचार करण्याच्या पद्धती, आणि कुठल्याही गोष्टीवर रीऍक्ट होण्याच्या पद्धती या गोष्टी जाणून घेण्याचा काळ कमी होतो
सहमत.
आणि तुम्ही डोक्यावर अक्षता पडल्यावर ताबडतोब एका मॅच्युअर आणि १००% परस्पर सामंजस्य असलेल्या, एकमेकांविषयी खूप ओढ आणि आपुलकी निर्माण झालेल्या नात्यामध्ये प्रवेश करता.अश्या १००% सामंजस्यपूर्ण नात्यात प्रवेश करण्यासाठी डोक्यावर अक्षता पडण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.
===
एकमेकांना समजून घेण्याच्या वरील पायऱ्या नीट पार पडल्या असतील तर खालील प्रश्न पडावयास नको होते असे वाटते-
ही घरात रमेल की नाही,
माझ्याशी एकरूप होईल की नाही,
===
खालील वाक्य बायकोला चूल-आणि-मूल यांच्यात बांधून टाकणारे आहे की काय असे वाटते.
घर व्यवस्थित सांभाळेल की नाही
===
खालील प्रश्नांना समांतर प्रश्न नवऱ्याच्या मनात येत नाहीत असे दिसते.
पूर्णपणे अनोळखी लोकांमध्ये मिसळून जायचं, त्यांना आपलं मानायचं, त्यांची सुख-दुःखे आपली जाणायची, सासू-सासरे काही बोलले तर निमूटपणे ऐकून घ्यायचं, त्यांच्यात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा सदोदित प्रयत्न करत बसायचा