एखाद्या गोष्टीचा 'शब्दार्थ' बघायचा नाही, फक्त 'मतितार्थ' बघायचा ही सरळ सरळ काढलेली पळवाटच नाही का? कुठल्याही गोष्टीचा शब्दार्थ नेमकाच निघू शकतो, पण मतितार्थ मात्र ढोबळ असतो. जर फलज्योतिषातील प्रत्येक गोष्टीचा फक्त ढोबळच अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर त्याला कशाच्या आधारावर शास्त्र म्हणायचं?
सगळ्यात महत्त्वाचं गृहितक 'सूर्य (रवि) हाही एक ग्रह आहे आणि तोही पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो कारण पृथ्वी या सौरमंडळाच्या केंद्रस्थानी आहे' याचा मतितार्थ /ढोबळ अर्थ सुध्दा विश्वास करण्याच्या लायकीचा नाही.
ऑफीअश्यूस (ophiuchus) ही रास (म्हणजेच आकाशाचा एक भाग) कायमच अस्तित्वात होती. खगोलशास्त्रानं याचं अस्तित्व काही वर्षांपूर्वी लक्षात आणून दिले. या संशोधनानं फलज्योतिषाचा पायाच उखडला गेला आहे. कारण एक ग्रह समजा एका राशीत दीड महीना रहात असेल तर बारा राशींमधून भ्रमण करून परत मूळ राशीत यायला त्याला अठरा महीने लागतील. पण जर राशीच तेरा असतील तर त्याला मूळ राशीत यायला साडे एकोणीस महीने लागतील. आणि असं गेले कित्येक लाखो वर्षं चालू आहे. म्हणजेच फलज्योतीषानुसार दर्शविलेली ग्रहस्थिती आणि खरी ग्रहस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
एवढं सगळं असूनही फलज्योतिषाला थोतांड म्हणायचं नाही का?