१) तुझा व्य नि मी आज़च वाचला आहे. आणि तदनुसार तुझ्या याहू निरोपकावरील ओळखीची नोंद केली आहे.
२) अज़ून सामावले नाही म्हणजे काय? हा कट्टा अ.भा.मराठी साहित्य संमेलनासारखा तीन-चार दिवस चालणारा उपक्रम/सोहळा नाही. त्यामुळे मागील शनिवारी तुला सामील होता आले नसले तरी पुढच्या वेळी जेव्हा कट्टा होईल तेव्हा नक्की हजेरी लावता येईल.
वृत्तांत आणि कट्टा दोन्ही छान आहे/झाले. वृत्तांत येथे दिल्याबद्दल रोहिणीकाकूंचे मनःपूर्वक आभार. गाणी गाताना/ऐकताना मजा आली. येथे लिहिणारी (मी सोडून काही) मंडळी खूप छान गातात हा शोध (मला) कट्ट्यावरच लागला. तात्यांचे गाणे (त्यांच्या अनुपस्थितीमुळे) ऐकायला मिळाले नाही. पुढच्या कट्ट्यावेळी ही कसर भरून काढता येईल अशी आशा करायला हरकत नाही.