>>मला अजून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ग़ांधी सारखा सब्जेट आपल्या मातीत असूनही एका ब्रिटिशाने त्यावर सुंदर कलाकृती काढून पोत्याने ऑस्कर मिळवावेत?<<

नाही ना सुचली अक्कल आधी दुसऱ्या कोणाला. परत नुसती कल्पना नाही त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी किंवा इच्छा ऍटनबरो च्या सगळ्या संचाकडे होती. 'चल जायेगा', 'कौन देखेगा इतना डीटेलमें' ह्या तालावर काम करत नव्हते ते लोक. आपल्या हिंदी इंडस्ट्री मधे याच सूत्रावर ९०% लोक काम करतात आणि उरलेले १०% चांगलं काम करायची तडफड करत बाजूला पडतात किंवा 'चल जायेगा' ब्रिगेड पुढे मान तुकवतात.