भाषा ही नुसती भाषा नसून ती एक संस्कृती असते. मराठीची एक वेगळी संस्कृती आहे जी उत्तर भारतीय संस्कृती पेक्षा निराळी आहे. पण विविध प्रसार माध्यमे आणि चित्रपट ह्यामुळे आपल्या संस्कृतीवर पण त्या संस्कृतीचे आक्रमण होत आहे.
उदाः कडवा चौथ
हे आक्रमण फक्त सणवार ह्या पुरते मर्यादित नसून, ते खाद्य पदार्थ, पोषाख, लग्नसमारंभ, रिती-रिवाज ह्या सर्वांवर होत आहे.
फारच महत्वाचा मुद्दा.
कड(र?)वा चौथ हे प्रतिकात्मक. कुठलाही लग्न समारंभ घ्या. लग्न लागल्यानंतरचे फेटाळ नृत्य, वराच्या चपला लपवणे, 'जीजाजी' हा तिरस्कारणीय शब्द... हे सगळेच आक्रमण..
लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात येणारे शुभसंदेश पहा. चिंकू, पिंकू, मुन्नी, मम्मी, पप्पा... हे ही गंभीर आक्रमण..
असे बरेच काही..