रीडर्स डायजेस्टने केलेला हा खटाटोप मी इथल्या पेपर्समध्येही वाचला. तो कुणीही मनावर घेतलेला मला दिसला नाही. माझ्या मते उर्मटपणा हा व्यक्तिनिरपेक्ष असतो....आणि हाच निकष लावायचा झाला तर लंडन हे जगातील सर्वात उर्मट शहर म्हणावे लागेल...पदोपदी thank you, sorry म्हणत खोटी सौजन्यशीलता दाखवण्यात हे लोक पटाईत आहेत..किम्बहुना, हे शहर manners and etiquettes च्या नावाखाली छुपे उर्मट आहेत...

उदा.

१. मी ज्या क्लब मध्ये जातो त्या क्लबची वार्षिक ३००० पाउण्ड फ़ी भरूनही मला तिथे काही "ड्रेसकोड" पाळावे लागतात. जर तुम्हि जीन्स आणि टी-शर्ट मध्ये क्लब हाऊसमध्ये गेलात तर तिथला वेटर तुम्हाला कपडे बदलून यायला सांगतो...नम्र शब्दात...पण मी पैसे दिलेले असताना हे सर्व होणं हेच उर्मट आहे...

२. बातमीत म्हटलेले निकष हे इतके अपुरे आहेत की रीडर्स डायजेस्टने त्यावर "निष्कर्ष " मांडणे हेच हास्यास्पद आहे. हे निकष पाश्च्त्यांच्या फ़ारतर सवयीचा भाग म्हणता येइल...तेच जणूकाही ग्लोबल सौजन्यशीलतेचे निदर्शक आहेत असे मानणे हा शुद्ध आगाऊपणा आहे..

३. इंग्रजांच्या सामाजिक खडूसपणाची असंख्य उदाहरणे देता येतील..उदा. ऑफिस मध्ये साहेबाशी किरकोळ भांडण झाल्यानंतर ६ महिन्याची भरपगारी "stress leave" घेणे, पत्ता विचारताना मला ठाऊक नाही असे सांगणे, स्वतः कारण नसताना "sick leave" टाकणे आणि दुसऱ्याने, विशेषतः आशियायी कर्मचाऱ्याने तसे केल्यास "कन्सर्न्स" जाहीर करणे.. हे सर्व ते अजूनहे "इम्पेरियल नॉस्टाल्जीया" मध्ये आहेत असे दाखवतो... हे तथाकथित सर्वेक्षण तेच सिद्ध करते असे मला वाटते...