प्रामाणिक कौतुक ( ऑनेस्ट ऍप्रीसिएशन ) करण्यात आपण कधीकधी कमी पडतो की काय अशी शंका येते. ' हे तुझं मला आवडलं, हे तू छान केलंस....' एवढंच काय पण ' हा तुझा शर्ट  / ड्रेस मस्त आहे ' एवढंही बोलण्यात आपण कद्रूपणा करतो. याचा तोंडपुजेपणा असा अर्थ काढला जाईल की काय अशीही सुप्त शंका आपल्या मनात येत असावी. पण योग्य गुणग्राहकता करता येणे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. मी जिथे काम करतो तिथल्या सहकारी स्त्री कर्मचाऱ्यांना ' आज तू नेहमीपेक्षा जास्त छान दिसतेस' असं मी म्हटल्यावर त्यांच्या नजरेत प्रथम आश्चर्य आणि नंतर आदरच मला दिसला. ( अशा प्रशंसेचे कोणतेही भडक अर्थ काढले गेले नाहीत, हे माझे सुदैव! ). त्यामुळे प्रामाणिक प्रतिसाद देता येणे हे आनंदाचे तर आहेच, पण गरजेचेही आहे असे मला वाटते.
मोठ्या आशयाची छोटी कथा दिल्याबद्दल वेदश्रीला धन्यवाद.