फक्त इथे चिकटवताना चिंटूच्या काकाची पूर्वपरवानगी घेतली असती तर चांगले झाले असते.
अगदी मनातलं बोललात, टग्या. ही गोष्ट इथे मी चिकटवण्याचीही गरज नाही खरं तर.. कारण चिंटूचा काकाही मनोगती आहे आणि त्याला इथे छान लिहिता देखील येतं ! खूपवेळेस कानीकपाळी ओरडूनही त्याने लिहिली नाही. आज इतक्या दिवसांनी ( खरं तर महिन्यांनी ! ) तो मेल परत एकदा वाचला मी. तरीही तीच तशीच मजा आली आणि हसू उमटलं चेहऱ्यावर त्या जुन्या आठवणींनी. तोच आनंद सर्वांना मिळावा म्हणून मी हे अनुभवकथन इथे टंकलिखित केले आहे. चिंटूच्या काकाला इ-पत्रात हा दुवाच पाठवावा म्हणते आहे.. बघुया काय म्हणतो ते !